WFH मुळे आकाश आज दुपारी २ च्या सुमारास सटाण्याला त्याच्या बुलेट वरून निघाला आहे. मी आता एकटाच रूम वर थांबलो आहे. तू कशाला थांबला आहेस असे तुम्ही विचाराल पण सोमवारी माझे ऑफिस ला काही काम आहे पण मला मनापासून हि मिळालेली शांतता अनुभवायची आहे लोकांपासून फेसबुक whatsapp बंद करून आपल्याला आवडेल ते काम कधी करायला मिळणार आहे त्यामुळे मिळालेली हि संधी मला दवडायची नाही. २४ तास माणसांच्या गराड्यातून मिळालेला मोकळा वेळ मला स्वतःला द्यायचा आहे .
Quarantine Mind
Saturday, 21 March 2020
पहिले पान
मोबाईलचा डेटा turnoff केला आणि हे पहिले पान लिहायला घेतले. मी ह्यात काय लिहणार हे माझे मला देखील माहित नाही पण माझ्या मनात जे काही येणार ते मी मांडत जाणार आहे काही दिवसांनी मी काय विचार करत होतो हे वाचून माझे मला हसू येईल पण हे लिहायची पण गंमत अनुभवायला हवी नाही का ?
आजची तारीख आहे २१ मार्च २०२० करोना virus ने सगळी कडे धुमाकूळ घातला आहे . आणि भारतात पुण्याला ह्या virus ने आपले माहेर बनवले आहे. सरकारने सांगितल्या मुळे IT कंपनी ने त्यांच्या गुलामांना घरून काम करायची परवानगी दिली आहे. थोड्यावेळ वाटले कि गुलाम शब्द काढून त्या जागी एम्प्लॉयी नावाचा गोंडस शब्द वापरावा पण खरंच कंपनी साठी मानवी जीवनाची काही किंमत आहे का नाही म्हणजे कुठल्याही
प्रोजेक्ट च्या अगोदर भरमसाठ प्लॅनिन्ग करून ठेवणाऱ्या ह्या कंपनी हा virus आपल्या कडे पण येऊ शकतो त्यामुळे आपण अगोदरच आपल्या कामगारांसाठी घरून काम करता येईल अशी व्यवथा करून ठेवायला काय झाले होते पण ठीक आहे सरकारने दट्ट्या दिल्या मुळे का होईना ह्या तयार तर झाल्या ते एक बरं झाले .
Subscribe to:
Posts (Atom)