Saturday, 21 March 2020

पहिले पान

मोबाईलचा डेटा turnoff केला आणि हे पहिले पान लिहायला घेतले. मी ह्यात काय लिहणार हे माझे मला देखील माहित नाही पण माझ्या मनात जे काही येणार ते मी मांडत जाणार आहे काही दिवसांनी मी काय विचार करत होतो हे वाचून माझे मला हसू येईल पण हे लिहायची पण गंमत अनुभवायला हवी नाही का ?

आजची तारीख  आहे २१ मार्च २०२० करोना  virus  ने सगळी कडे धुमाकूळ घातला आहे . आणि भारतात पुण्याला ह्या virus  ने आपले माहेर  बनवले आहे.  सरकारने सांगितल्या मुळे  IT  कंपनी ने त्यांच्या गुलामांना घरून काम करायची परवानगी दिली आहे. थोड्यावेळ वाटले कि गुलाम शब्द काढून त्या जागी एम्प्लॉयी नावाचा गोंडस शब्द वापरावा पण खरंच कंपनी साठी मानवी जीवनाची काही किंमत आहे का नाही म्हणजे कुठल्याही 
प्रोजेक्ट च्या अगोदर भरमसाठ  प्लॅनिन्ग करून ठेवणाऱ्या ह्या कंपनी हा virus  आपल्या कडे पण येऊ शकतो त्यामुळे आपण अगोदरच आपल्या कामगारांसाठी घरून काम करता येईल अशी व्यवथा करून ठेवायला काय झाले होते पण ठीक आहे सरकारने दट्ट्या दिल्या मुळे  का होईना ह्या तयार तर झाल्या ते एक बरं  झाले . 

No comments:

Post a Comment